ZP election voting Maharashtra
esakal
कराड : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी आज सकाळी साडेसात वाजता मतदानास (ZP election voting Maharashtra) प्रारंभ झाला. मात्र, काल शुक्रवारी रात्री माजी सहकारमंत्री ज्येष्ठ नेते (कै) विलासराव पाटील-उंडाळकर यांचा नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील-उंडाळकर यांचा चिरंजीव अधिराज पाटील यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. त्यामुळे उंडाळे भागातील मतदान केंद्रावर बिबट्याच्या दहशतीखाली मतदान सुरु आहे. (Leopard attack during election voting in Karad)