
-हेमंत पवार
कऱ्हाड : निसर्गाच्या साखळीतील वन विभागाच्या शेड्यूल एकमधील वन्यप्राणी म्हणून बिबट्याकडे पाहिले जाते. पूर्वी जंगलात असणारा बिबट्याचा वावर जंगले ओसाड होऊ लागल्याने नागरी वस्तीकडे सरकू लागल्याचे त्याच्या वास्तव्यावरून स्पष्ट झाले आहे. सुमारे ३० वर्षांपासून बिबट्यांचे नागरी वस्तीकडे स्थलांतर होत असून, त्यादरम्यान बिबट्याने आपल्या स्वभावातही त्या-त्या भागानुसार बदल केल्याचे वन विभागाच्या पाहणीत दिसून आले आहे.