
कित्तुर येथील निवासी गृहातील 80 विद्यार्थ्यांनीना कोरोनाची लागण
बेळगाव : कित्तुर येथील सैनिक शाळेत कोरोनाचा (Corona)शिरकाव झाला असून राणी चन्नम्मा निवासी गृहातील 80 विद्यार्थिनीना (80 students)व 10 कर्मचाऱ्यांना(10 Staff) कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये एकच भीतीचे वातावरण पसरले असून इतर विद्यार्थ्यांनीना घरी पाठविण्यात येत आहे
हेही वाचा: ठेवीची रक्कम परत न केल्याने पतसंस्थेच्या संचालकांवर गुन्हा दाखल
कित्तुर येथील निवासी गृहात कर्नाटकासह महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व इतर राज्यातील विद्यार्थिनी राहतात. तसेच या विद्यार्थिनी सैनिक शाळेत शिक्षण घेत आहेत. दोन दिवसांपूर्वी निवासी गृहातील 102 विद्यार्थिनींमध्ये ताप, सर्दी, खोकल्याची लक्षणे दिसून आली होती. त्यानंतर आरोग्य खात्यातर्फे विद्यार्थिनींची रॅपिड व आरटीपीशीआर टेस्ट करण्यात आली होती. त्यानंतर 2 दिवसांनी 12 विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र पुढच्या दोन दिवसात आणखीन 68 विद्यार्थिनींना कोरोना ची लागण झाली असून 10 कर्मचारीही करुणा पॉझिटिव्ह आले आहेत त्यामुळे निवासी गृहातील तब्बल 90 जण कोरोना पॉझिटिव आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा: लसीकरण केंद्रासाठी वेळेची मर्यादा नाही : केंद्राकडून स्पष्टीकरण
निवासी गृहातील अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थींना कोरोना झाल्याचा आरोप पालक व विद्यार्थिनीनी असून सध्या व्यवस्थापन मंडळ देखील याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थिनी या 15 ते 18 वयोगटातील आहेत. काही दिवसांपासून या वयोगटातील विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशातच काही विद्यार्थ्यांनीना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थिनीवर उपचार सुरू करण्यात आले असून इतर विद्यार्थ्यांना घरी पाठविण्यास सुरुवात झाली आहे.
हेही वाचा: राजभवनाचे स्पष्टीकरण, मंत्रिमंडळ विस्तारावेळी वेळेची कोणतीही मर्यादा नाही
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढू लागला असून काही भागात विद्यार्थ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून येत असल्याने सर्व शाळांनी कोरोना नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्यानी मास्कचा वापर करीत सामाजिक अंतर राखणे गरजेचे आहे. कित्तुर येथील निवासी गृहातील विद्यार्थ्यांनीना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इतर भागातही भीतीचे वातावरण पसरले आहे.
Web Title: Corona Infection 80 Students In Kittur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..