
"Limb’s proud moment — daughter-in-law achieves MPSC hat-trick through dedication and hard work."
esakal
-सुधीर जाधव
गाेवे: 'आयुष्यात काही कमवायचं असेल तर काही गमावायची सुध्दा तयारी ठेवावीच लागते. तेव्हाच आकाशाला सुध्दा गवसणी घालता येते'. काळ आणि वेळ कधीच काेणासाठी थांबत नसते, त्यामुळे कष्टातून आणि जिद्दीच्या जाेरावर प्रत्येक दिवस यशाकडे वाटचाल करायची असते. हेच स्वप्न उराशी बाळगून पुजा दिलीप वाघमळे(वय 27) यांनी महाराष्ट्र लाेकसेवाच्या आयाेगाच्या परीक्षेत तीन वेळा सुय़श मिळवून यशाला गवसणी घातली आहे. सध्या त्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन अंतर्गत सातारा जिल्हा क्रीडा अघिकारी कार्यालयात कार्यरत आहेत, त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्यातून काैतुक हाेत आहे.