
-प्रशांत घाडगे
सातारा : राज्यातील विविध ठिकाणी महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी राज्य सरकारने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश काढले होते. मात्र, या आदेशाची पायमल्ली होताना दिसून येत आहे. जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या एकूण शाळांपैकी केवळ १५ टक्के सरकारी शाळेत सीसीटीव्ही बसविला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये एखादा अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण? असा प्रश्न पालक विचारत आहेत.