Banks Push for Recovery Despite Loan Waiver Announcement
sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : राज्य सरकारने ३० जून २०२६ पर्यंत शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामध्ये ३० मार्च २०२६ ला जे शेतकरी थकीत कर्जदार असतील त्यांनाच ती कर्जमाफी मिळणार आहे. या अटीमुळे एकीकडे राज्य सरकारची कर्जमाफीची घोषणा अन् दुसरीकडे बँकांकडून वसुलीसाठी तगादा अशी स्थिती सध्या निर्माण झाली असून, शेतकरी मात्र दुहेरी कात्रीत अडकला आहे.