

Political Buzz in Karad: Aspirants Line Up for Chairman Post
Sakal
-हेमंत पवार
कऱ्हाड : येथील पंचायत समितीत ऐतिहासिक सत्तांतर घडवत भाजपने १३ सदस्य निवडून आणून एकहाती सत्ता घेतली. त्यात कऱ्हाड दक्षिणचे आमदार डॉ. अतुल भोसले यांचे आठ, तर कऱ्हाड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे यांचे पाच सदस्य आहेत. येथील पंचायत समितीचे सभापतिपद हे सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. निकालानंतर आता इच्छुकांनी नेत्यांकडे सभापतिपदासाठी लॉबिंग सुरू केले आहे.