

Love Affair Ends in Bloodshed: Wife, Lover Accused in Engineer’s Murder Plot
sakal
कऱ्हाड : प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीच्या सांगण्यावरून प्रियकरासह अन्य एका साथीदाराने तीन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागातील अभियंता लक्ष्मण मंडले यांचा बनावट अपघाताद्वारे खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित दोन संशयितांना अटक करून गुन्ह्यात वापरलेली मोटारही जप्त केली आहे.