लॉकडाउनमुळे झेंडू कोमेजला, कोरोनाने बळीराजा हिरमुसला!

झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाउन व संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे.
Marigold
Marigold esakal
Updated on

मसूर (सातारा) : झेंडू उत्पादक शेतकऱ्यांना लॉकडाउन व संचारबंदीचा मोठा फटका बसला आहे. गुढीपाडव्याला होणारी विक्रीची उलाढालही झाली नाही. त्यातच मागणी नसल्याने बाजारपेठेत दरच नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याने झेंडू उत्पादकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

गुढीपाडव्यास 60 दिवसांचा अवधी असतानाच झेंडूची लागण केली जाते. शेती पिकांत कोणी नुसतीच झेंडूची लागण करतात. एक रोप तीन रुपये याप्रमाणे खरेदी केली जाते. खते फवारणी केल्यानंतर 60 दिवसांनी त्याचे उत्पादन सुरू होते. ज्यावेळी लागण केली. त्या वेळी राज्यात कोरोनाचे सावट कमी प्रमाणात होते. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या संख्येची भर पडत असल्याने शासनाने लॉकडाउनची घोषणा केली आहे. त्यातच गुढीपाडवा या सणाला फुलांचा उठाव पाहिजे त्या प्रमाणात झाला नाही.

साधारण प्रतिकिलो 50 रुपये याप्रमाणे जर दर मिळेल, अशी अपेक्षा होती; पण ती फोल ठरली. झेंडूची विक्री करता आली नाही. परिणामी, फूल उत्पादकांना आर्थिक फटका सहन करावा लागला. त्यातच प्रशासनाने मंदिरे बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने फुलांची विक्री बंद झाली आहे. कमी दिवसात मेहनत घेऊन तयार केलेले उत्पादन विक्रीअभावी वाया जात आहे. त्यामुळे झेंडू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

मागील वर्षीही कोरोनामुळे गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा- दिवाळी सणांसह लग्न व इतर समारंभासाठी फुलांची विक्री झाली नाही. त्यामुळे आर्थिक घडीच विस्कटली असून, हे नुकसान न भरून येणारे आहे.

-प्रकाश माळी, फूल उत्पादक शेतकरी

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Crores Lost as Heavy Winds Rip Off Shed Sheets, Sugar Stock Damaged by Rain
Karad Nandalapur flyover completion update
Dreams Cut Short: 16-Year-Old Student Dies in Head-On Crash Near Banpuri
Mahayuti Stands Together, Says Desai; Voting Decision Left to Eknath Shinde
Marathi News Esakal
www.esakal.com