esakal | लोणंद: कोयत्याचा दरोड्यात साडेपाच लाखाची रोखड लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

लोणंद: कोयत्याच्या दरोड्यात साडेपाच लाखाची रोखड लंपास

लोणंद: कोयत्याच्या दरोड्यात साडेपाच लाखाची रोखड लंपास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लोणंद: कोयत्याने कारची काच फोडून, तसेच कोयत्याचा धाक दाखवून अज्ञात पाच चोरट्यांनी चालकाकडील ५ लाख ३४ हजार रुपयांची रोकड लंपास केली. काल (ता. ९) सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तरडगाव (ता. फलटण) गावच्या हद्दीत परहर ते मॅग्नेशिया कंपनीकडे जाणाऱ्या अंतर्गत रस्त्यावरील रेल्वे पुलानजीक ही घटना घडली.

हेही वाचा: पाटण : पावसाच्या पुनर्रागमनाने शेतकरी हरखला; पिकांना मिळालं जीवदान

याबाबत लोणंद पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, तरडगाव येथील मॅग्नेशिया कंपनीतील लेबर कॉन्ट्रक्टर घेतलेले कृष्णात हरिदास गायकवाड (वय ३४) हे काल सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कारमधून परहर ते मॅग्नेशिया कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरून निघाले होते. या रस्त्यावर असणाऱ्या रेल्वे पुलावर आल्यावर त्यांनी त्यांच्या कारचा वेग कमी केला. त्या वेळी दोन मोटारसायकलवरून पाच अनोळखी व्यक्ती कारजवळ आहे. कोयत्याने मारून एकाने कारची काच फोडली.

कोयत्याचा धाक दाखवत गाडीमधील ५ लाख ३४ हजार रुपयांची रोख रक्कम, मोबाईल व कारची चावी जबरदस्तीने चोरून नेली. पोलिसांकडून चोरट्यांच्या शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी परिसरात तपास पथके कार्यरत करण्यात आली आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, कृष्णात गायकवाड यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. या घटनेची नोंद लोणंद पोलिस ठाण्यात झाली आहे. लोणंदचे सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर तपास करत आहेत.

loading image
go to top