esakal | पाटण : पावसाच्या पुनर्रागमनाने शेतकरी हरखला; पिकांना मिळालं जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

पिकांना मिळालं जीवदान

पाटण : पावसाच्या पुनर्रागमनाने शेतकरी हरखला; पिकांना मिळालं जीवदान

sakal_logo
By
जालिंदर सत्रे

पाटण (सातारा) : सलग महिन्याहून जादा काळ पाऊस नसल्याने पाटण तालुक्यातील खरीप हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जाण्याच्या मार्गावर होता. जमिनीस भेगा पडून पिके करपण्याच्या मार्गावर होती. मात्र, दोन ते तीन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने शिल्लक खरिपाला जीवदान मिळाले आहे. पावसाची पुन्हा हजेरी लागत असल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा: जेलफोडोचा प्रसंग अभिमानास्‍पद, आदर्शवत : वैभव नायकवडी

चक्रीवादळ व अतिवृष्टीने खरिपाचे कंबरडे मोडले होते. त्यातून वाचलेल्या पिकांवर दीर्घ काळ पावसाने उघडीप घेतल्याने पुन्हा आपत्ती कोसळली आहे. पिकांच्या वाढीच्या काळातच पावसाने अवकृपा केल्याने बळिराजाची अवस्था केविलवाणी झाली. हलक्या जमिनीतील पिके पूर्ण करपली असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीन पिकाला या वर्षी चांगले पीक होते. मात्र, पाऊस नसल्याने पिके पक्व न होता जाग्यावरच वाळली आहेत. कडधान्य पिकांची अवस्था सोयाबीनसारखीच असून, भुईमुगाच्या शेंगा यावर्षी घरी खायला शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तरी मिळतील का, अशी परिस्थिती आहे.

हेही वाचा: गणेशोत्सवाची खरेदी करून घरी निघालेल्या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यु

खरीप हंगामातील मुख्य पीक व शेतकऱ्यांचा खरा आधार असणारे भात पीक जाग्यावरच खुंटले आहे. वाढीच्या काळात पाऊस न पडल्याने त्याला फुटवे नाहीत व वाढही खुंटलेली आहे. ६० टक्के भाताच्या उत्पन्नात घट होणार असून, कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. मात्र, दमदार परतीचा पाऊस पडत असल्याने भात पिकाबाबत शेतकऱ्याला आशा निर्माण झाली आहे. कमी कालावधीची व हलक्या जमिनीतील भात पीक हातातून गेले असले, तरी पडत असलेल्या पावसामुळे जादा कालावधीच्या भात पिकांना जीवदान मिळाल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण आहे.

loading image
go to top