

Satara Horror: Minor Accused of Killing Boy in Lonand; Police Probe After Anonymous Call
Sakal
लोणंद: शिक्षणासाठी भाड्याने खोली घेऊन राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलाने दुसऱ्या एका २२ वर्षीय मुलाचा किरकोळ कारणावरून क्षणिक रागाच्या भरात कमरेच्या बेल्टने गळा आवळून खून केल्याची घटना काल रात्री आठ ते सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास येथे घडली. घटनेनंतर खून करणाऱ्या अल्पवयीन मुलानेच कोणीतरी अज्ञाताने एकाचा खून केल्याबाबत लोणंद पोलिसांना ११२ क्रमांकावरून कळवले.