
Lonand Crime
लोणंद : देशी- विदेशी दारुची विनापरवाना चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या दोघांना लोणंद पोलिसांनी रंगेहाथ पकडले. यामध्ये त्यांच्याकडून आठ हजार ८८० रुपये किमतीच्या विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्या व ६० हजार रुपये किमतीची एक मोटारसायकल असा एकूण ६८ हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.