esakal | शीतपेयांचा व्यवसाय यंदाही थंडच; कोरोनामुळे व्यावसायिक मेटाकुटीला

बोलून बातमी शोधा

Ice Cream
शीतपेयांचा व्यवसाय यंदाही थंडच; कोरोनामुळे व्यावसायिक मेटाकुटीला
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कऱ्हाड (सातारा) : शिमगा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आइस्क्रीम व्यवसाय तेजीत येतो. मात्र, यंदाही कोरोनामुळे धंदा थंडच आहे. संचारबंदीमुळे केवळ पार्सल देण्याचे आदेश आहेत. मात्र, त्याला मिळणारा प्रतिसादही अत्यल्प आहे. त्यामुळे आईस्क्रीम व्यावसायिकही मेटाकुटीस आले आहेत.

कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या निर्बंधात शीतपेयांचा व्यवसाय सुरू आहे. मात्र, त्याला मिळणारा प्रतिसाद अत्यंत थंड आहे. त्याचा फटका आईस्क्रीमच्या व्यावसायिकांना सोसावा लागत आहे. उन्हाळा संपेपर्यंत अशीच स्थिती राहिल्यास यंदाही आईस्क्रीम विक्रेत्यांवर वाईट वेळ येणार आहे. दुकाने बंद असल्याने बाजारपेठांमध्ये कमी झालेली गर्दी, बाहेर फिरण्यावर असणारे निर्बंध, घरून काम सुरू असल्याने कार्यालयांत येणाऱ्यांची कमी झालेली संख्या, मर्यादित माणसांच्या उपस्थित होणारे कार्यक्रम, घरगुती स्वरूपात होणारे सण-उत्सव आदींमुळे आईस्क्रीमचा खप अगदी पाच टक्‍क्‍यांवर आला आहे.

एखाद्याला कोरोना झाला, तर त्याची गावभर सेलिब्रेटीपेक्षा जास्त चर्चा व्हायची; पण मी ठरवलं..

त्यामुळे धंद्यातील उलाढालदेखील कमी झाली आहे. त्यामुळे कामगारांचे पगार, दुकानाचे भाड्यासह दैनंदिन खर्च कसा भागवायचा व कर्जाचे हप्ते कसे भरायचे असा प्रश्‍न व्यावसायिकांना पडला आहे. केवळ पार्सलपुरती परवानगी आईस्क्रीम व्यवसायाला देण्यात आली आहे. मात्र, त्यालाही फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. आईस्क्रीम पार्लरजवळ ग्राहक उभे राहिल्यास पोलिसांकडून त्यांना हटवण्यात येत आहे.

Edited By : Balkrishna Madhale