Inspiring Story: हरली परिस्थिती; जिंकली जिद्द...; रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावले; दयानंद मानेंची ढेबेवाडीत नव्याने भरारी !

Railway accident survivor: इच्छाशक्ती आणि कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी स्वतःला शारीरिक व मानसिकदृष्ट्या उभं केलं. कृत्रिम पाय, फिजिओथेरपी आणि सततच्या प्रयत्नांमुळे ते पुन्हा चालू लागले. आज ते स्वावलंबी बनले असून अनेकांना प्रेरणा देत आहेत. गावात आणि परिसरात त्यांच्या जिद्दीची कथा सर्वत्र चर्चेत आहे.
Courage Reborn: Dayanand Mane’s Remarkable Journey from Tragedy to Triumph”

Courage Reborn: Dayanand Mane’s Remarkable Journey from Tragedy to Triumph”

Sakal

Updated on

-राजेश पाटील

ढेबेवाडी : रेल्वेतून पडल्याने मांडीपासून दोन्ही पाय गमावले अन् मुंबई सोडून गाव गाठावे लागले. ओढवलेल्या बिकट स्थितीमुळे मुंबईत कष्टाने उभारलेले औषध दुकान बंद करावे लागले. आता सगळं संपलंय असे वाटत असतानाच मनातील जिद्द मात्र हार मानायला तयार नव्हती. पाय तर गमावलेत जिद्द नाही... असे म्हणत पुन्‍हा सुरू झाला स्वप्नांचा पाठलाग. कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार आणि समाजातील सहृदयी मंडळी पाठीशी उभी राहिली आणि संघर्षाच्या वाटेवर धाडसाने टाकलेल्या एक एक पावलाने त्यांना पुन्हा बनवले एका औषध दुकानाचे मालक...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com