अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीचा प्रियकरानं काढला काटा, संशयिताला 12 तासांत अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Crime News

'फिरोजच्या पत्नीशी माझे अनैतिक संबंध होते. त्यात तो आडकाठी करत होता.'

अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीचा प्रियकरानं काढला काटा

सातारा : कोंडवे (ता. सातारा) येथे काल रात्री अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या प्रेयसीच्या पतीचा प्रियकरानं खून केल्याची खळबळजनक घटना घडलीय. हा गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तालुका पोलिसांनी (Satara Police) अवघ्या १२ तासाच्या आत उघडकीस आणला असून, प्रियकराला अटक करण्यात आलीय.

शकील निजाम फरास (४२, रा. नेले, ता. सातारा) असं त्याचं नाव आहे. त्यानं काल रात्री साडेआठपूर्वी कोंडवे हद्दीत फिरोज चाँद मुलाणी यांचा डोक्यात धारदार शस्त्र घालून खून केला. या खुनाबाबत अस्लम चाँद मुलाणी (रा. नेले, ता. सातारा) यांनी काल रात्री तालुका पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरूद्ध फिर्याद दिली होती. खुनाचा गंभीर गुन्हा असल्यामुळं पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक किशोर धुमाळ व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विश्वजित घोडके यांना गुन्ह्याचा तपास तातडीने लावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या नेतृत्वाखाली तपास पथक नेमण्यात आले होते. तपास पथकानं घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली. परिसरामध्ये केलेल्या चौकशीमध्ये याचे नाव पथकाला समजले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आली.

हेही वाचा: चिनी सैन्यात हिंदी जाणणाऱ्या तरुणांची भरती, गुप्तचर अहवालातून माहिती समोर

चौकशीमध्ये त्यानं गुन्ह्याची कबुली दिलीय. फिरोज याच्या पत्नीशी माझे अनैतिक संबंध होते. त्यात तो आडकाठी करत होता. त्यामुळं त्याचा खून केल्याची माहिती त्यानं पोलिसांना दिलीय. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धुमाळ, घोडके, सहायक निरीक्षक गर्जे, अभिजित चौधरी यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व तालुका पोलिसांचे कर्मचारी या तपासात सहभागी होते. अवघ्या १२ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणल्याबद्दल श्री. बन्सल व श्री. बोऱ्हाडे यांनी तपास पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

Web Title: Lover Murdered The Lovers Husband Through An Immoral Relationship

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top