machindra sakte over uddhav thackeray maharashtra political party split
machindra sakte over uddhav thackeray maharashtra political party split Sakal

Satara News : दलित महासंघाच्या अध्यक्षांचा उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवून काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला.

पाटण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली, असे उद्धव ठाकरे म्हणत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवून काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. हे त्यांना शोभते का ? शिवसेनेला वाचवण्याचे काम एकनाथ शिंदे शंभूराजे यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे, असे मत दलित महासंघाचे अध्यक्ष प्राध्यापक मच्छिंद्र सकटे यांनी व्यक्त केले.

खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ पाटण (जि.सातरा) येथे जाहीर प्रचारसभा झाली. त्यामध्ये ते बोलत होते. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, भाजपचे नेते भरत पाटील, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई, डॉ. दिलीप चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जयवंत शेलार आदी उपस्थित होते.

प्रा. सकटे म्हणाले, शरद पवार यांना साथ करायचा निर्णय घेतला. त्यांनी मला अण्णाभाऊ साठे महामंडळाचे अध्यक्षपद दिले. 1999 साली महाराष्ट्रात संघर्ष असताना शरद पवार यांचे सरकार आले. यावेळी मी महाराष्ट्रभर फिरून सांगतोय नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करूया असे सांगत आहे. तेच पंतप्रधान होणार आहेत.

शिवसेना फुटल्या पासून उद्धव ठाकरे हे माझा बाप चोरला असे म्हणत आहेत. त्याचे खापर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फोडले जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने जातीधर्मापलिकडे शिक्षण दिले मात्र उद्धव ठाकरे यांच्याकडून गलिच्छ भाषेत भाषण केले जात आहे. आदित्य ठाकरे थेट मुख्यमंत्र्यावर टीका करत आहेत.

आपल्या आजोबांच्या सहकाऱ्यांची त्या भाषेत बोलतोय ती भाषा मला सहन होत नाही. एकनाथ शिंदे शिवसेनेतून बाजूला झाल्यापासून मिंदे सरकार असे म्हणत आहेत. मुख्यमंत्री शिंदे सर्वसामान्यांचे नेते आहेत.

ठाकरे यांना मुख्यमंत्र्याबरोबर बोलणे शोभते का ? एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गद्दारी केली. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपवून काँग्रेस बरोबर जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला. हे त्यांना शोभते का ? शिवसेनेला वाचवण्याचे काम एकनाथ शिंदे शंभूराजे यांच्या सहकाऱ्यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com