मधुसागरला अडचणीत आणण्याचा डाव

संजय गायकवाड; राज्य शासनाच्या खादी ग्रामोद्योग संस्थेच्या माध्यमातून मध खरेदी
honey
honeysakal

महाबळेश्वर - महाराष्ट्रातील सर्वात मोठी मध उत्पादक सहकारी संस्था म्हणून ‘मधुसागर’ या संस्थेची ओळख असून, महाबळेश्वर, वाई व जावळी हे तीन तालुके कार्यक्षेत्र आहे. सध्या ही सहकारी संस्था मोडीत काढण्याचे काम शासनच करू लागले आहे. शेतकऱ्यांची मध खरेदी करून ही संस्था अडचणीत आणण्याचे काम खादी व ग्रामोद्योगच्या माध्यमातून केले जात असल्याची खंत ‘मधुसागर’चे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.

देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघर गावाची निवड झाली. या प्रकल्पाचा प्रारंभही नुकताच झाला. ही संकल्पना राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. याबाबत संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांना हात घातला. ते म्हणाले, ‘‘१९५५ मध्ये ‘मधुसागर’ची स्थापना झाली. देशातील पहिले मधाचे गाव म्हणून मांघरची ओळख निर्माण होत आहे, याचा आनंद आहे. ‘मधुसागर’चे ९९ टक्के सभासद मांघरचे असून, मधुसागर व मांघरचे अतूट नाते आहे. ही संस्था गेली ३५ ते ४० वर्षे नफ्यात असून, सभासदांना २५ वर्षे लाभांश देत आहे. या पर्यटनस्थळी होणाऱ्या स्ट्रॉबेरी, राजबेरी, मलबेरी, आवळा, कोकम, जांभूळ या फळांची वर्षभर खरेदी करून त्यावर प्रक्रिया करून आकर्षक उत्पादनेही विक्रीस आणली आहेत. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आम्ही प्रयत्नशील आहे; परंतु खादी ग्रामोद्योगने स्वतःच हा मध संकलित करण्याचे काम सुरू केल्याने शासनच शासनाची जुनी संस्था मोडीत काढत आहे.’’

आमच्या सभासदांनी मध काढायचा, शासन म्हणून त्यांनी त्यांच्या दारात जायचे व मध घेऊन खुलेआम विक्री करायची. स्वतःचे ब्रँडिंग करायचे व विक्री करायची हे योग्य नाही, अशी टीकाही त्यांनी केली. आमच्या संस्थेच्या सभासदांनी इतर ठिकाणी मध द्यायचा नाही, अशी तरतूद असूनही खादी व ग्रामोद्योग सभासदांकडून मध गोळा करत आहे. ‘मधुसागर’ संस्थेच्या या अडचणींबाबत आमदार मकरंद पाटील यांना माहिती दिली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्री आदिती तटकरे यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे, अशी माहिती संजय गायकवाड यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com