Public Security Bill: साताऱ्यात महाविकास आघाडी आक्रमक! 'जनसुरक्षा विधेयकाची होळी करत केंद्र सरकारचा निषेध',कायदा जनतेची मुस्कटदाबी करणारा

Strong opposition in Satara: आंदोलनकर्त्यांनी संविधान विरोधी सरकारचा धिक्कार असो, फडणवीस तुमचे करायचे काय.. खाली मुंडी वर पाय.., मोदी सरकारचा निषेध असो, महाविकास आघाडीचा विजय असो, जनसुरक्षा विरोधी कृती समितीचा विजय असो, शिवसेना झिंदाबाद, अशी घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
MVA workers in Satara burn copies of the Public Security Bill, raising slogans against the central government.

MVA workers in Satara burn copies of the Public Security Bill, raising slogans against the central government.

Sakal

Updated on

सातारा: केंद्राने आणलेल्या जनसुरक्षा विधेयकाला विरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी आज राज्यव्यापी निषेध आंदोलनाची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर येथील पोवई नाक्यावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष व संघटनांनी जनसुरक्षा विधेयकाच्या पत्रकांची होळी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. दरम्यान, हे विधेयक मंजूर करण्याच्या प्रयत्न केंद्र सरकारने केल्यास महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. त्याची पहिली ठिणगी प्रतिसरकार असलेल्या साताऱ्यातून पडेल, असा इशारा डॉ. भारत पाटणकर यांनी दिला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com