

Mahabaleshwar officials conduct midnight action against an illegal roadside stall operating under election code cover.
Sakal
महाबळेश्वर: आचारसंहिता लागू झाल्यावर त्वरित वेण्णा लेक येथे रात्री अंधाराचा फायदा घेत स्टेनलेस स्टीलची टपरी ट्रकमधून आणून ती क्रेनद्वारे बसविण्याची व्यवस्था होत होती. तेथील जागृत व्यावसायिक, वन विभागाचे अधिकारी व पालिका प्रशासनाने हा डाव हाणून पाडण्यासाठी मोठा फौजफाटा जमा करावा लागला. मध्यरात्री सुमारे तीन तासांच्या या नाट्यात टपरीधारकांचा डाव हाणून पाडण्यात आल्याने अखेर या नाट्यावर पडदा पडला.