Mahabaleshwar Municipal Election
esakal
महाबळेश्वर : महाबळेश्वर नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाबळेश्वरात नाट्यमय राजकीय घडामोडी घडल्या. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने नगराध्यक्षपदावरील बंडखोरी यशस्वीपणे मोडून काढली, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची बहीण आणि माजी नगरसेविका विमल ओंबळे यांनी प्रभाग चारमधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.