Mahabaleshwar Rain Record : महाबळेश्वरमध्ये पावसाचा हाहाकार, 24 तासांत 513 मिमी पाऊस; मोडला तब्बल 123 वर्षांपूर्वीचा विक्रम, प्रशासनाकडून हायअलर्ट जारी

Mahabaleshwar Records 513 mm Rainfall in Just 24 Hours : महाबळेश्वरमध्ये अवघ्या २४ तासांत ५१३ मिमी विक्रमी पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे वेण्णा नदीवरील पूल खचला, रस्त्यांचे नुकसान झाले आहे.
513 mm rainfall in Mahabaleshwar today

513 mm rainfall in Mahabaleshwar today

esakal

Updated on

महाबळेश्वर : गेल्या पाच- सहा दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने यंदा महाबळेश्‍वरातील सर्व जुने विक्रम मोडीत काढले आहेत. रविवारी सकाळी आठ ते सोमवारी सकाळी आठ या अवघ्या २४ तासांत तब्बल ५१३ मिलिमीटर (२० इंच) पावसाची नोंद (Mahabaleshwar heavy rainfall latest news) झाली. हा यंदाच्या हंगामातील सर्वाधिक पाऊस ठरला आहे. १ जूनपासून आजअखेर महाबळेश्वरमध्ये १७१७.४० मिलिमीटर (६७ इंच) पावसाची नोंद झाली असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com