
महाबळेश्वर: महाबळेश्वर ते तापोळ्याला जोडणारा मुख्य रस्ता काही दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे वाहून गेला होता. याचबरोबर मोठ्या प्रमाणावर दरड रस्त्यावर आली होती. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दरड हटवून खचून गेलेला रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. अखेर आज हे काम पूर्ण झाले असून, रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे स्थानिकांसह प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे.