

महाबळेश्वर: महाबळेश्वरमधील प्राकृतिक संवेदनशीलता आणि जमिनींचे वनसदृश स्वरूप लक्षात घेता तेथील भाडेपट्टा नूतनीकरणाचे जिल्हाधिकारी यांच्याकडे असलेले अधिकार शासनस्तरावर घेण्याचे निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. मंत्रालयात झालेल्या बैठकीत त्यांनी महाबळेश्वर परिसरातील शासकीय, तसेच देवस्थान जमिनींवरील बेकायदेशीर अतिक्रमण तातडीने हटविण्याच्या स्पष्ट सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या.