

Maharashtra Tunnel Project Three New Underground Routes to Connect Mahabaleshwar Kas Medha and Tapola for Faster Travel
sakal
महाबळेश्वर: पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि दळणवळण अधिक जलद व सुलभ करण्यासाठी मुंबई- पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाच्या धर्तीवर तीन भुयारी रस्ते (बोगदे) उभारण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. महाबळेश्वर, कास, मेढा आणि वाई या मार्गांवरून हे प्रकल्प राबविले जाणार असून, यामुळे पर्यटन वाढीसोबतच रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.