
महाबळेश्वर: येथे गेल्या आठ दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. थंडीत वाढ झाली आहे. येथील वेण्णालेक तलावातून वेण्णा नदी ओसंडून वाहत आहे. आज पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवार आठवडे बाजाराचा दिवस असल्याने आठवडे बाजारासाठी आलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. आज सकाळी साडेआठ वाजता संपलेल्या २४ तासांत १७३ मिलिमीटर (७ इंच) पावसाची नोंद झाली.