महाबळेश्वरच्या विकासात योगदान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यास पालिकेने डावलले

सिद्धार्थ लाटकर
Thursday, 21 January 2021

आमदार मकरंद पाटील यांचे महाबळेश्वरकडे सदैव लक्ष असते. विकासकामांचा डोंगर उभा करताना, महाबळेश्‍वर पालिकेचे अनेक प्रश्‍न, घोडे व्यवसायिक, टॅक्‍सीचालक यांचे प्रश्‍न ते नेहमी मार्गी लावतात; परंतु महाबळेश्वर पालिकेत गेल्या काही दिवसांपासून राजकारण पेटले आहे.

सातारा : महाबळेश्वर शहराच्या विकासासाठी राज्य शासनाने सन 2020-21 च्या अर्थसंकल्पात 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महाबळेश्वर पालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. या निधीसाठी सातत्याने पाठपुरावा करून तो महाबळेश्‍वरला मिळवून देण्यात महत्वाचे योगदान
देणाऱ्या आमदार मकरंद पाटील यांचे नाव या अभिनंदनाच्या ठरावातून वगळण्यात आले आहे. आमदार पाटील यांना पालिकेने डावलल्याने महाबळेश्‍वरच्या राजकीय वर्तुळ नुकतेच ढवळून निघाले.

महाबळेश्वर गिरीस्थान पालिकेने काही दिवसांपुर्वी विशेष सभेचे आयोजन करून शहर विकासासाठी 100 कोटी रुपये दिल्याने राज्य शासनाच्या अभिनंदनाचा ठराव संमत केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व नगरसेवकांचे अभिनंदन या ठरावात करण्यात आले आहे. खरं तर या निधीसाठी योगदान देणाऱ्या आमदार पाटील यांचे नाव वगळल्याची माहिती नुकतीच समोर आल्याने त्याचे पडसाद महाबळेश्वरच्या राजकीय क्षेत्रात उमटले.

पालिकेचे उपाध्यक्ष अफझल सुतार यांच्या माध्यमातून पालिकेत मकरंद पाटील यांच्या विचारांच्या नगसेवकांचा गड राखला गेला आहे. अभिनंदन ठरावावर सूचक म्हणून कुमार शिंदे व अनुमोदक म्हणून युसूफ शेख यांचे नाव आहे. या ठरावातून आमदार पाटील यांचे नाव वगळे गेल्याने राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. आमदार पाटील यांच्या विचारांचे 12 नगरसेवक असतानाही आमदारांचेच नाव अभिनंदनाच्या ठरावातून वगळल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

या 100 कोटींच्या निधीचा पालिकेने आमदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य वापर करावा अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली हाेती. परंतु अभिनंदन ठरावात त्यांच्याच पक्षाच्या आमदार मकरंद पाटील यांचेच नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या गटाचे नगरसेवक  आता कोणती भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे.

आमदार मकरंद पाटलांच्या चर्चेनंतर महाबळेश्वर पालिकेत रंगले राजकारण

कर्करोग, संसर्गजन्य रोगावर नॅनोकार्गो उपाय; भारतीय संशोधकाचा युरोपियन युनियन कमिशनकडून सन्मान

शेतकरी चिंताग्रस्त; बटाट्याच्या दरात घसरण सुरुच 

मतदार विमानाने आला अन गुलाल लावून गेला; लोहा तालुक्यातील चित्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mahableshwar Muncipal Council Makrand Patil Uddhav Thackreay Ajit Pawar Satara Marathi News