
वाई: श्रावणातील शेवटचा सोमवार असल्याने आज येथील कृष्णा तीरावर परिसरातील गावाच्या व खेड्यापाड्यातील ग्रामदेवतांच्या पालख्या आज कृष्णा नदीवर आल्याने महागणपती घाटावर जत्रेचे स्वरूप आले होते. या वेळी वरुणराजाच्या साक्षीने भाविकांनी महागणपती आणि महादेवाचे दर्शन घेतले.