
सातारा : कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) या जलविद्युत प्रकल्पासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देतानाच ८६२ कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. अतिरिक्त वीजनिर्मिती करण्यासाठी या पायथा विद्युतगहाचे नियोजन करण्यात आले आहे. यातून एकूण ८० मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे.