
“Mahabaleshwar depot staff replace faulty ‘Red ST’ engine on-site in 7 hours, ensuring smooth service.”
-संदीप गाडवे
केळघर : गेल्या ७७ वर्षांपासून महाराष्ट्राच्या खेडोपाड्यात अविरत व सुरक्षित सेवा देऊन एसटीने सर्वसामान्य प्रवाशांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. अशी ‘लालपरी’ महाबळेश्वरच्या दुर्गम भागात धावताना अचानक बंद पडली. मग टोचण लावून ती आगारात न्यायची म्हटल्यावरही जागची हलेना, अशी ती स्थिती. तेव्हा मात्र कार्यशाळेच्या कारागिरांनी हे आव्हान समजून, तिचे इंजिन जागीच उतरवून ते बदलले आणि दुरुस्त करून ती पुन्हा धावती केली.