esakal | दहा रुपयांचा भुर्दंड कशासाठी? एसटी महामंडळाने पुर्ननिर्णय घ्यावा
sakal

बोलून बातमी शोधा

दहा रुपयांचा भुर्दंड कशासाठी? एसटी महामंडळाने पुर्ननिर्णय घ्यावा

बस स्थानकावरून कोल्हापूर-सांगलीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्या आता पोवई नाका-गोडोलीमार्गे जाणे-येणे अपेक्षित आहे. तसेच कोरेगावकडून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्याही पोवई नाक्‍यावरून यायला पाहिजेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.

दहा रुपयांचा भुर्दंड कशासाठी? एसटी महामंडळाने पुर्ननिर्णय घ्यावा

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून पोवई नाक्‍यावर केलेले ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले असून, त्याचे दोनदा उद्‌घाटन झाले. मात्र, अजूनही एसटीच्या कोल्हापूर, सांगलीकडे जा- ये करणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या मार्गाने मार्गस्थ होत आहेत. नागरिकांचे पैसे, वेळ आणि एसटीचे इंधन वाचावे, यासाठी पोवई नाक्‍यावरूनच जाणे गरजेचे आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
 
साताऱ्यात पोवई नाक्‍यावर होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी ग्रेड सेपरेटरचे काम करण्यात आले आहे. हे काम सुमारे तीन वर्षे सुरू होते. या काळात एसटीची वाहतूक वाढेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषदेकडून वळविण्यात आली होती. यामुळे कोल्हापूर, सांगलीकडून तसेच सोलापूर, म्हसवड, कोरेगावकडून येणाऱ्या व ज्यांना जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोवई नाका येथे जायचे असलेल्या प्रवाशांना बॉम्बे रेस्टॉरंट चौकात उतरावे लागत होते. तेथून पोवई नाक्‍याकडे यायचे म्हटले की रिक्षाने यावे लागत होते. तेथून पोवई नाक्‍यापर्यंत रिक्षाचालक लॉकडाउनपूर्वी दहा रुपये घेत असत. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर वाहतूक काहीशी सुरू होताच रिक्षाचालकांनी भाडे दुप्पट केले. नाईलाजाने दुप्पट भाडे (20 रुपये) देऊन प्रवासी पोवई नाक्‍यावर येत.
 
आता ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाले आहे. अधिकृत उद्‌घाटनही झाले. वाहतूक सुरू झाली. मात्र, अजूनही एसटीच्या कोल्हापूर-सांगली, कोरेगावकडून येणाऱ्या काही गाड्या जिल्हा परिषद मार्गेच बस स्थानकावर जात आहेत. पोवई नाक्‍यावरून गाड्या जाणे शक्‍य असूनही एसटी त्या बाजूने आणल्या जात नाहीत. यामुळे पोवई नाक्‍यावर येणाऱ्या प्रवाशांना जिल्हा परिषदेपासून नाक्‍यावर येण्यासाठी थोड्या अंतरालाही 20 रुपये मोजावे लागत आहेत. तो प्रवाशांना भुर्दंड पडत आहे. बस स्थानकावरून कोल्हापूर-सांगलीकडे जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व गाड्या आता पोवई नाका-गोडोलीमार्गे जाणे-येणे अपेक्षित आहे. तसेच कोरेगावकडून येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्याही पोवई नाक्‍यावरून यायला पाहिजेत. एसटीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने याबाबतची कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. 

अजूनही दहा रुपयांचा भुर्दंड कशासाठी? 

ग्रेड सेपरेटरचे काम सुरू झाल्यानंतर गेली तीन वर्षे वाढेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून एसटीच्या गाड्या येत-जात होत्या. त्यात बस स्थानकावर येण्या-जाण्याचे अंतर वाढते म्हणून एसटीने दहा रुपयांनी तिकीट वाढविले होते. सर्व प्रवाशांनी कुरकुर न करता वाढीव शुल्क दिले. आता ग्रेड सेपरेटरचे काम झालेले असताना एसटीच्या गाड्या इतर मार्गाने नेण्याचे काहीच कारण नाही. बस स्थानकावर येण्याचे अंतर कमी होईल. एसटीचे इंधन वाचेल आणि प्रवाशांनाही दहा रुपयांचा भुर्दंड पडणार नाही.

साता-यात पहिले पाढे पंचावन्न; उदयनराजेंची डाेकेदुखी वाढणार?

आमचं कार्यालय सांगलीला पळविण्याचे कारण काय? शेतकरी आक्रमक

ठरलं! जिल्हा बॅंकेतून आमदार गोरेंचा पत्ता कट?; माण-खटावच्या नेत्यांची रामराजेंसोबत खलबत्तं!

जुगार अड्ड्यावरील छाप्यात साताऱ्यात पाच जणांवर गुन्हा

सुटी नाय द्यायची... निर्णयाशिवाय जायचं नाय; अठ्ठ्याऐंशी वर्षीय जगतापांचा निर्धार

Edited By : Siddharth Latkar

loading image