दिवाळी निमित्त ठाणे, सोलापूरसह राज्यभरात साता-याहून एसटीच्या जादा गाड्या

प्रशांत घाडगे
Wednesday, 4 November 2020

प्रवाशांची संख्या वाढल्याने गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जाणाऱ्या एसटी फेऱ्याची संख्या पूर्वीप्रमाणे केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले. 
 

सातारा : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या चार महिन्यांपासून वाहतूक ठप्प होती. मात्र, गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या एसटी स्थानकांवर दिवाळीनिमित्त प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीच्या कालावधीत राज्यातील विविध ठिकाणी जाण्यासाठी एसटीच्या सातारा विभागाच्या वतीने जादा 90 फेऱ्या सोडण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
 
कोरोनाच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेली एसटी सेवा गेल्या महिन्यात सुरू झाली. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे फेऱ्यांची संख्या कमी ठेवण्यात आली होती. मात्र, आता प्रवाशांची संख्या वाढल्याने फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. एसटी विभागाने दिवाळीनिमित्त उत्पन्न वाढविण्यासाठी जिल्ह्यातील सातारा, कऱ्हाड, कोरेगाव, फलटण, वाई, पाटण, दहिवडी, महाबळेश्‍वर, मेढा, खंडाळा, वडूज या 11 स्थानकांमधून नियमित फेऱ्या व्यतिरिक्त 90 फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. यामध्ये मुंबई, बोरिवली, ठाणे, पुणे, कोल्हापूर, सांगली, नगर, सोलापूर, लातूर, महाड व राज्यभरातील इतर ठिकाणी जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती एसटी विभागाने दिली आहे.

मुंबईबाहेरील ST कर्मचाऱ्यांना आता जेवणाऐवजी भोजन भत्ता; दैनंदिन 200 रुपये देण्याचा एसटीचा निर्णय
 
प्रवाशांची संख्या वाढल्याने गेल्या 15 दिवसांपासून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जाणाऱ्या एसटी फेऱ्याची संख्या पूर्वीप्रमाणे केल्याने प्रवाशांची गैरसोय दूर झाल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.

व्यावसायिकांची घरपट्टी माफ करा, उदयनराजे गरजले  

दिवाळीनिमित्त सातारा आगारातून नियमित फेऱ्याव्यतिरिक्त इतर जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे, तसेच दिवाळीच्या कालावधीत प्रवाशांची संख्या वाढल्यास फेऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे.
 
रेश्‍मा गाडेकर; एसटी आगारप्रमुख (कनिष्ठ), सातारा. 

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maharashtra State Transport Bus Service In Diwali Satara News