

Manayachiwadi Gram Panchayat in Maharashtra Distributes Diwali Bonus to Villagers After Winning Prestigious National Awards
esakal
सातारा : दिवाळी म्हटली की आनंद, उत्साह आणि गोडधोडाची रेलचेल! मात्र, सातारा जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीने यंदा दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणित केला आहे. गावातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य फुलावे आणि सणाचा आनंद सर्वांना घेता यावा, यासाठी पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना दिवाळी बोनस देण्याचा उपक्रम राबविला आहे. अवघी ४२० लोकसंख्या आणि ९८ कुटुंबे असलेल्या या गावाने केवळ बोनस देऊनच नव्हे, तर लोकसहभागातून विकासाचा नवा आदर्श निर्माण करून राज्यासह देशाचे लक्ष वेधले आहे.