वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास समाजाची प्रगती : प्रदीप विधाते

वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास समाजाची प्रगती : प्रदीप विधाते

विसापूर (जि.सातारा) ः समाजातील वाईट गोष्टी दूर करण्यासाठी महात्मा फुले यांनी अविरत संघर्ष केला. अस्पृश्‍यता निवारण, महिलांच्या शिक्षणासह शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी कार्य केले. त्यांना अभिप्रेत असणारा वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवल्यास समाजाची प्रगती होईल, असे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते यांनी सांगितले.
 
महात्मा फुले यांची कुलभूमी कटगुण (ता. खटाव) येथे त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमात श्री. विधाते बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, समाजकल्याण व पंचायत समितीच्या प्रभारी सभापती कल्पना खाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जाधव प्रमुख म्हणून उपस्थित होते.

श्री. विधाते म्हणाले, ""महात्मा फुले यांनी शेतकरी, अस्पृश्‍यता निवारण आणि बहुजन समाजाच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हे त्यांनी ओळखल्यामुळे शिक्षणाची कवाडे सर्वांना उघडून दिली.'' 
लोकसेवेच्या संधीचे सोने करीन : ललिता बाबर

या वेळी माजी उपसभापती संतोष साळुंखे, गटविकास अधिकारी रमेश काळे, सहायक गटविकास अधिकारी नरेंद्र मेढेवार, सोलापूर डायटचे प्राचार्य रामचंद्र कोरडे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रतिभा भराडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. युनिस शेख, शिक्षण विस्तार अधिकारी लक्ष्मणराव पिसे, डॉ. आदित्य गुजर, विस्ताराधिकारी चव्हाण, सरपंच जयश्री गोरे, उपसरपंच जयदीप गायकवाड, माजी सरपंच उदय कदम, सुधीर गोरे, नंदकुमार गोरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब गायकवाड, विशाल देवकर, सागर जावळे, सुरेखा गायकवाड, सुषमा पाटोळे, सुनंदा गोरे, केंद्रप्रमुख जयश्री चव्हाण, सुरेखा पवार, ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य व अंगणवाडी विभाग अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

महाकवी महात्मा फुलेंचे कवितांमधून समाजचिंतन

Edited By : Siddharth Latkar

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com