Maharashtra Health Scheme Fraud SIT Investigation
esakal
-सचिन शिंदे
कराड : आजारपणाने आलेल्या संकटावर मात करताना अनेकजण घाईला येतात. त्यात बदल व्हावा, यासाठी शासनाने महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य आणि विस्तारित आयुष्मान भारत योजना सुरू (Ayushman Bharat scheme fake billing allegations Maharashtra) केली. मात्र, त्याच लोककल्याणकारी योजनांचा गैरफायदा घेत काही खासगी रुग्णालये आणि यंत्रणांनी संगनमत करत बिलात बोगसगिरी केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे या योजनांतील तक्रारींबाबत विशेष पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी होणार आहे.