
कऱ्हाड : जागतिक वारसा स्थळाच्या यादीत राज्यातील १२ जिल्ह्यांचा समावेश झाल्यानिमित्त राज्य शासनातर्फे दर वर्षी गडकोट किल्ल्यांच्या संवर्धनासाठी काम करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे. यंदापासून हा पुरस्कार दिला जाणार आहे. गडकोट किल्ल्यांचा अभ्यास, त्याच्या संवर्धनात किमान १० वर्षे कार्यरत असलेल्या संस्था अथवा व्यक्तींला तीन लाख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.