सरकार पडण्याची स्वप्ने नैराश्‍यातून; शंभूराज देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शंभूराज देसाई

सरकार पडण्याची स्वप्ने नैराश्‍यातून; शंभूराज देसाई

सातारा : राज्यात महाविकास आघाडीला(mahavikas aghadi ) दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. सरकारच्या कामावर राज्यातील जनता समाधानी आहे. महाविकास आघाडीचे सरकार पडणार असे विरोधक नैराश्‍यातून बोलत असून, १७० आमदार पाठीशी असताना पुढील तीन वर्ष राज्य सरकार हलणारही नसल्याचे गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई(shambhuraje desai) यांनी सांगून भाजपवर(bjp) पलटवार केला. दरम्यान, राज्यात कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी सर्वात कडक शक्ती कायदा अमलात आणणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Satara | हिम्मत असेल तर समोरासमोर या : उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजे यांना आव्हान,पाहा video

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येऊन दोन वर्ष पूर्ण झाल्याने श्री. देसाई यांनी गृह विभागांसह इतर पाच विभागांच्या कामाचा आढावा आज पत्रकार परिषदेत मांडला. श्री. देसाई म्हणाले, ‘‘राज्यात गृहविभागांतर्गत नोकरभरती होणार असून, आरोग्य खात्यातील बारा हजार पदे भरण्याचा निर्णय झाला आहे. त्यामधील सद्यःस्थितीत पाच हजार पदे भरण्याचाही प्रक्रिया सुरू झाली आहे. याचबरोबर कोरोनाच्या संकटात पोलिसांनी जीव धोक्यात घालून लोकांना मदत केली. या काळात राज्यात मृत्यू झालेल्या ३९० कर्मचाऱ्यांना ५० लाख सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. राज्य सरकार सत्तेत आल्यापासून दोन वर्षांत पोलिस खात्यासाठी बाराशे कोटींची तरतूद केली आहे. राज्यात कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापन करणार आहे.’’

हेही वाचा: सातारा : महिलांना ई-बाईक खरेदीस पाच हजार

जिल्ह्यात राबविलेल्या महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्पाच्या माध्यमातून ७२१ गावांत समुपदेशन करण्यात आले असून, शाळांमध्ये ऑनलाइन ट्रेनिंगही देण्यात आले आहे. याचबरोबर राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान केंद्र प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. पाटण तालुक्यात दोन वर्षांत ४२९ कोटींची कामे प्रत्यक्षात झाली असून, मल्हारपेठ व मसूर या ठिकाणी नवीन पोलिस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहेत, असे त्यांनी सांगितले. कोविडच्या काळात राज्याच्या तिजोरीत एक हजार कोटी महसूल कमी आला असून, त्याचा विकासावर परिणाम झाला आहे, तरीही जिल्हा नियोजन समितीच्या निधीत वाढ करून २०२०-२१ मध्ये ३२५ कोटी, तर २०२१-२२ मध्ये ३७५ कोटी करण्यात आला. सातारा सैनिक स्कूलच्या अंतर्गत विकासासाठी दोनशे कोटींचा प्रस्ताव असून, चालू वर्षात १०० कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, पाटण तालुक्यात दोन दिवसांपूर्वी एका लहान मुलीवर अत्याचार करून खून केल्याची घटना घडली होती. यावर हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असून, मनोधैर्य योजनेतून या कुटुंबीयांना दहा लाख रुपये देणार आहे. यासाठीच प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: देहविक्रय करणाऱ्या पाच हजार महिलांना आठ कोटींचे अर्थसाह्य

राणे नारळ व बत्ताशावरील पैलवान

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजप प्रणीत पॅनेल निवडून आले आहे. यानंतर नारायण राणेंनी वाघाच्या शेपटाला पकडले असून, त्याला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखत असल्याचे कार्टून प्रसिद्ध करून शिवसेनेवर टीका केली. यावर मंत्री देसाई यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘जिल्हा बँकेची निवडणूक ही जिल्हा केंद्रित असते. मात्र, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत राणे यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. त्यामुळे राणे हे नारळ व बत्ताशावरील कुस्ती जिंकत असताना हिंदकेसरी कुस्ती जिंकल्याचा आव आणत आहेत.’’

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top