
महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये देसाई समर्थक जाधव निवडून आले आहेत.
Satara : सोसायटी निवडणुकीत महाविकास आघाडीचं जबरदस्त वर्चस्व
बिजवडी (सातारा) : विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या निवडणुकीत (Bijwadi Society Election) राष्ट्रवादी कॉँग्रेस (NCP)- कॉँग्रेस-शिवसेनेच्या महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलने भारतीय जनता पक्ष- राष्ट्रीय समाज पार्टी- शेखर गोरे गट (Shekhar Gore Group) पुरस्कृत पॅनेलचा १२-१ ने पराभव करत सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व मिळवले.(Bijwadi Society Election)
महाविकास आघाडीप्रणीत (Mahavikas Aghadi) पॅनेलचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे ॲड. कुंडलिक भोसले, पांडुरंग भोसले, उपाध्यक्ष विकास निंबाळकर, कॉँग्रेसतर्फे जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केले. पराभूत झालेल्या पॅनेलचे नेतृत्व भाजपतर्फे माजी उपसरपंच संजय भोसले, रासपतर्फे जिल्हाध्यक्ष मामूशेठ वीरकर, तर शेखर गोरे गटातर्फे माजी सभापती तुकाराम भोसले यांनी केले. महाविकास आघाडीच्या पॅनेलमधून शंकर बापू जाधव. बापूराव जोतीराम दडस, विकास जिजाबा निंबाळकर, लालासाहेब गणपत पवार, कुंडलिक दादासाहेब भोसले, जनार्दन बाबूराव भोसले, प्रज्योत हणमंत भोसले, रुक्मिणी पंढरीनाथ भोसले, कमल आनंदराव वीरकर, पांडुरंग नाना साळुंखे, यशवंत म्हंकाळ गाढवे, अशोक रघुनाथ अडागळे, तर भाजपकडून संजय दादासाहेब भोसले हे उमेदवार विजयी झाले आहेत.
हेही वाचा: 'निवडणुकीत उदयनराजे-शिवेंद्रराजे आमनेसामने असतीलच असं नाही'
महाविकास आघाडीच्या पॅनेलमध्ये अनिल देसाई समर्थक शंकर जाधवही निवडून आले आहेत. नूतन संचालकांचे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, एम. के. भोसले, शिवाजीराव भोसले, संजय भोसले, पंढरीनाथ भोसले, अनिल भोसले, रंगाशेठ भोसले, हणमंतराव भोसले, आनंदराव वीरकर, शिवाजीराव बरकडे, जोतिराम जाधव, तसेच राष्ट्रवादी, कॉँग्रेस, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
Web Title: Mahavikas Aghadi Wins 12 1 In Bijwadi Society Election
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..