
सातारा : महायुती सरकारने पाच एचपीपर्यंतच्या कृषिपंपांना वीजबिल माफी दिली आहे. त्यानुसार अशा सर्व शेतकऱ्यांच्या कृषिपंपाच्या खात्याची बिले शून्य केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते; पण गेल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना शेती पंपाच्या बिलासंदर्भात मोबाईलवर मेसेज आले आहेत. याबाबत महावितरणकडून काहीच स्पष्टता झालेली नाही, तसेच हे ऑनलाइन वीजबिल ओपनही होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.