
Shashikant Shinde
वाई : राज्य अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना सरकारकडून मदतीच्या नावाखाली तोंडाला पाने पुसण्याचे काम केले. दुसरीकडे मराठा व ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नांवर सरकार ठोस भूमिका घेत नसल्याने जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीला फटका बसणार, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केला, तसेच आगामी पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढविणार असल्याचे सांगितले.