

Shashikant Shinde
sakal
सातारारोड : विधिमंडळाच्या या अधिवेशनात राजकीय कुरघोड्या, आरोप- प्रत्यारोप आणि कोट्या करणारी भाषणे ऐकली. त्यातून राज्यातील सामान्य जनतेला काहीही मिळाले नाही. जाहीर केलेल्या योजनांमध्ये फक्त व्यावसायिकता होती, त्यावरून केवळ भांडवलशाही आणि कंत्राटदारांचे असलेले हे सरकार विविध पातळ्यांवर अपयशी ठरले आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.