
कुडाळ: गेल्या ३० वर्षांपासून महू व हातगेघर धरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराकडून जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करण्यात येत आहे. हे काम तातडीने पूर्ण करून धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात लवकरात लवकर पोहोचवावे, या मागणीसाठी जावळी तालुक्याच्या ४१ गावांतील धरणग्रस्त व लाभधारक कृती समितीच्या वतीने तीन सप्टेंबरपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. वेळप्रसंगी धरणात जलसमाधी घेण्याचा इशारा समितीचे अध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी पत्रकार परिषदेत दिला.