

Satara fraud
Sakal
सातारा : लग्नाला जाण्यासाठी मागून घेतलेल्या कारची बनावट कागदपत्रांच्या साह्याने परस्पर विक्री करणे तसेच जीपीएसच्या आधारे ठिकाणे शोधून तीच गाडी चोरून त्याची कोल्हापूर व सांगली येथील विविध जणांना पुन्हा विक्री करत अनेकांना गंडा घातल्याप्रकरणी एकाला शहर पोलिसांनी अटक केली आहे. मोहित मोतीलाल मिनेकर (वय २५, रा. पाचगा, ता. करवीर, जि. कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. या गुन्ह्यामध्ये त्याची पत्नी रुकसाना मोहिता मिनेकर (वय २२, दोघे रा. करवीर, जि. कोल्हापूर) व युवराज रामचंद्र जाधव (रा. प्रतापसिंहनगर, सातारा) हे संशयित आहेत.