

Bhuiinj and Satara police display stolen valuables worth ₹18 lakh recovered after arresting six suspects in the travel theft case.
Sakal
भुईंज : जिल्ह्यातील विविध बस स्थानकावर बसमध्ये चढ- उतार करणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या सहा अट्टल गुन्हेगारांना भुईंज पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेले सहा लाख ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण १८ लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.