

Pune-Bengaluru Highway Set for Transformation with New Flyovers and Bypass Projects
sakal
-प्रशांत घाडगे
सातारा : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघात लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मोठी पावले उचलली आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच खंबाटकी घाट आणि पुण्यातील नवले पूल परिसराची पाहणी करून वाहतूक समस्यांचा आढावा घेतला. या मार्गावर पाच ते सहा ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यासह इतर उपाययोजना केल्या जाणार असल्याने पुणे ते सातारा प्रवास अवघ्या एका तासात होणार आहे. यासाठी तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) केला जात आहे. या प्रकल्पामुळे सातारा- पुणे महामार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.