

Pune–Satara Highway Stretch Upgraded as Khambatki Ghat Shines Ahead of Visit
sakal
-अशपाक पटेल
खंडाळा : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी येत्या शनिवारी शिरवळ व भुईंज येथे येणार असल्याने खंबाटकी घाटातील रस्ते, घाट महामार्गावरील पट्टे व रोलिंग बॅरिकेड्स आदी कामे युद्धपातळीवर करण्यात आली आहेत. घाटात आता एकही खड्डा नसून रस्ता चकाचक झाल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.