

Police seize Gopal Badne’s mobile in connection with Phaltan doctor’s suicide case; suspects to appear before court today.
Sakal
फलटण : फलटणमधील डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित निलंबित पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने याच्या नातेवाइकांनी त्याचा मोबाईल आज पोलिसांकडे जमा केला. त्यामुळे बदने व डॉक्टर युवतीमधील संभाषण, चॅट यातून गुन्ह्यासंदर्भात पुरावे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, उद्या बदने व प्रशांत बनकर या दोघांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.