
सातारा: राज्यात सध्या पावसाचा जोर वाढला असून, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहणार आहे. अतिवृष्टीमुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीमुळे राज्यात शेत पीक, फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, अशी सूचना मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी केली आहे.