

Makrand Patil
Sakal
वाई : येथील जनतेने मला सलग चार वेळा वाढत्या मताधिक्याने निवडून दिले आहे. मी तुमच्यासारखा काठावर पास होत नाही. ग्रामविकास खात्याच्या मंत्र्यांना शहरात निधी टाकता येत नाही. वाईची जनता सुज्ञ आहे. पालिकांची वर्गवारी ही लोकसंख्येवर अवलंबून असल्याने तुम्ही तुमच्या म्हसवड नगरपालिका ‘ब’ वर्गात नेण्यासाठी प्रयत्न करा. वाईकरांच्या नादाला लागू नका, असे आवाहन मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांनी दिले.