मलकापूर : भांडी, फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूवर २५ ते ५० टक्के सवलतीमध्ये आगाऊ बुकिंग करून थोड्या दिवसांनी साहित्य देण्याचे परप्रांतीयाकडून आमिष दाखवण्यात आले. त्याला बळी पडून अनेकांनी आगाऊ रक्कम भरून गुंतवणूकही केली..मात्र, संबंधित दुकानदार लाखोंची फसवणूक करून गायब झाल्याने गुंतवणूकदारांनी बंद दुकानाचे कुलूप तोडून दुकानातून वस्तूंची पळवा-पळवी केली. आगाशिवनगर येथील वृंदावन कॉलनीत आज सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली..Akola Fraud: सख्ख्या मावसभावाकडून ३२ लाखांची फसवणूक व्यापाऱ्याचे पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन.गेल्या महिन्यात परप्रांतीय व्यक्तींनी सोना ट्रेडर्स नावाचे भांडी फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीचे दुकान सुरू केले होते. दुकानाची जाहिरातही केली होती. दुकानात ॲडव्हान्स बुकिंगद्वारे वस्तू नेणाऱ्यास २५ टक्के, तर काही मुदतीनंतर नेणाऱ्यांना ५० सवलत देणार अशी पावती गुंतवणूकदाराला दिली होती. पहिल्या १५ दिवसांत काहींना वस्तूही मिळाल्या. त्यामुळे वस्तू बुकिंग करणाऱ्यांची संख्या वाढली..गुरुवारपर्यंत (ता. १३) सुमारे ८०० जणांनी बुकिंग केल्याची घटनास्थळावरून माहिती मिळाली. संबंधित गुंतवणूकदारांनी प्रत्येक वस्तूचे ॲडव्हान्स बुकिंग करून संपूर्ण रक्कम जमा केली. तशा पावत्याही दिल्या आहेत. लाखो रुपये त्यांच्याकडे जमा झाले असावेत, अशी गुंतवणूकदारांत घटनास्थळी चर्चा होती..नेहमीप्रमाणे काल रात्री साडेआठ वाजता दुकान बंद करून ते घरी निघून गेले. त्यानंतर मध्यरात्री एक ते दीड वाजण्याचा सुमारास संबंधित दुकान उघडून बंद केल्याचे आसपासच्या नागरिकांनी सांगितले. रोज सकाळी साडेआठ ते नऊ वाजता दुकान उघडणारे साडेदहा वाजून गेले, तरी उघडले नाही. .Congress Leader Kolhapur : कोल्हापुरात काँग्रेस नेत्याचा बंगला फोडला, पत्नीवर धारधार शस्त्राने वार; कुरिअर बॉय असल्याचा बहाण्याने रोकड लुटली.त्यामुळे वस्तू नेण्यासाठी जमलेल्या गुंतवणूकदारांमध्ये संबंधित परप्रांतीय रक्कम घेऊन पसार झाले असावेत, असा समज झाला. गुंतवणूकदारांनी दुकानाची शटर तोडून आत प्रवेश करून वस्तूंची पळवा-पळवी केली. हाताला जे सापडेल ते घेऊन जात होते. यावेळी काही गुंतवणूकदारांत बाचाबाचीही झाली. मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी त्यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी थेट कऱ्हाड शहर पोलिस ठाणे गाठले. तक्रार घेण्याचे काम पोलिस ठाण्यात सुरू होते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.